मतदान चाचण्यांचे कल भाजपला प्रतिकूल
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
रविवारी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या सर्व राज्यांमध्ये काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला धूळ चारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. निवडणूक निकाल तीन डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी मतदारांच्या चर्चेतून जाहीर झालेले एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल भाजपाला धडकी भरवणारे आहेत, तर काँग्रेसला सुखद धक्का देणारे आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता टिकवण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे, तर मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपाला काटे कि टक्कर दिली असून भाजपची सत्ता जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेलंगणामध्ये बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांची हॅटट्रिक रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत आहे. असे असले तरी येथे देखील काँग्रेस अघाडीवर आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट विरुद्ध काँग्रेसच्या लढतीला यंदा मिझोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाचेही आव्हान आहे. यामुळे येथे दोन स्थानिक पक्षांच्या लढतीत काँग्रेसचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
छत्तीसगडमध्ये निवडणुकीच्या निकालापूर्वी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप या दोन्ही पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत, त्यापैकी 75 जागा जिंकण्याचा काँग्रेसचा दावा आहे. छत्तीसगडच्या एक्झिट पोलच्या निकालानुसार काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सरकारविरोधात सत्ताविरोधी लाट नाही. एबीपी-सी व्होटर एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला कौल देण्यात आला आहे. याठिकाणी 41 ते 53 जागा, तर भाजपला 36 ते 48 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना मिळू शकणाऱ्या जागांचे आकडे 1 ते 5 पर्यंत आहेत. ॲक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 40-50, भाजपला 36-46 आणि इतरांना 1 ते 5 जागा देण्यात आल्या आहेत. राज्यात एकूण 90 जागा आहेत. बहुमताचा आकडा 46 आहे.
जन की बातच्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राजस्थानमध्ये भाजपला 100-122 जागा, काँग्रेसला 62 ते 85 जागा देण्यात आल्या आहेत आणि इतरांना एकही जागा देण्यात आलेली नाही. राज्यात एकूण 200 जागा आहेत. येथे सरकार स्थापन करण्यासाठी 101 जागांची आवश्यकता आहे. राजस्थानमध्ये गेल्या 25 वर्षांपासून प्रत्येक वेळी सरकार बदलण्याची प्रथा आहे. इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला इथे 86 ते 106 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला राजस्थानमध्ये 80 ते 100 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. तर 9-18 जागांवर अन्य पक्ष, अपक्ष विजयी होऊ शकतात.
मध्य प्रदेशात काँग्रेसची हवा असल्याचं सांगितलं जात आहे . पण निकाल भलताच लागू शकतो. कारण भाजप आणि काँग्रेसमध्ये इथं काँटे की टक्कर होण्याचा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. मध्य प्रदेशात एकूण जागा 230 आहेत. यांपैकी बहुमताचा आकडा 116 आहे. मतदानोत्तर चाचण्यांमधून बहुतांश ठिकाणी काँग्रेस बहुमताचा आकडा गाठू शकते असे अंदाज आहेत. पण काही चाचण्यांमध्ये भाजप या बहुमताच्या जवळ असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं मध्य प्रदेशातील निकाल हे रंजक असण्याची शक्यता आहे.
हैद्राबाद- तेलंगणामधील सीएनएनच्या मतदानोत्तर चाचण्यांमधून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असल्याचं चित्र आहे. तर सत्ताधारी बीआरएसला राज्यात धक्का बसणार आहे. सीएनएनच्या मतदानोत्तर चाचण्यांनुसार काँग्रेसला 56 जागा मिळतील, तर बीआरएसला 48 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. भाजपला 10 जागा मिळतील असा अंदाज आहे.इंडिया टिव्ही-सीएनएक्स मतदानोत्तर चाचण्यांनुसार, तेलंगणात बीआरएस 70 जागा जिंकत सत्तेत परत येईल. काँग्रेसला 34 जागा मिळतील. भाजपला 7 जागांवर समाधान मानावे लागेल. औवैसींचा पक्ष 7 जागा जिंकू शकतं. जन की बात मतदानोत्तर चाचण्यांनुसार , काँग्रेसला 48 ते 64 जागा मिळू शकतील. काँग्रेस बीआरएसच्या पुढे जाईल. बीआरएसला 40 ते 55 जागा मिळू शकतात. तर भाजपला 7 ते 13 जागांवर समाधान मानावे लागेल.
“जन की बात“ मतदानोत्तर चाचण्यांनुसार, यावेळी मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट सरकार स्थापन होऊ शकते. 15 ते 25 जागा मिळतील, असा अंदाज चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. तर सत्ताधारी पक्षाला यावेळी 10 ते 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या पक्षाला न्यूज 18 मतदानोत्तर चाचण्यांमध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंटने बहुमताचा जादुई आकडा गाठण्यात यश मिळवले आहे. जनमत चाचण्यांमध्ये जेपीएमला 20 जागा मिळताना दिसत आहेत. त्याच वेळी, मिझो नॅशनल फ्रंट 12 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मिझोरामच्या 40 जागांच्या विधानसभा मतदारसंघासाठी 7 नोव्हेंबरला निवडणुका झाल्या होत्या. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत झोरमथांगाचा पक्ष 10 वर्षांचा वनवास संपवून सत्तेत परतला. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत, मिझोरमच्या मिझो नॅशनल फ्रंट आणि त्याचे अध्यक्ष झोरामथांगा यांनी मंगळवारी मिझोराम विधानसभा निवडणुकीत 28 जागा जिंकून जोरदार पुनरागमन केले होते. 2013 मध्ये मिझोराममध्ये विक्रमी जागा जिंकणारी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर घसरली होती, तर झोरम पीपल्स मूव्हमेंट 8 जागा जिंकून विरोधी पक्षात बसली होती होती.
राज्य वाहिनी काँग्रेस भाजप
राजस्थान एबीपी 81 108
सीएनएक्स 74 111
आजतक 1006 100
मध्यप्रदेश सीएनएक्स 111 116
टूडे 74 151
मॅट्रीझ 107 130
छत्तीसगड एबीपी 42 47
चाणक्य 65 41
आजतक 53 48