अशोक म्हात्रे यांचे प्रतिपादन
| चिरनेर | प्रतिनिधी |
अष्टगंध कला मंचाच्या प्रत्येक स्त्री पुरुष कलाकाराला नाट्य वेडाने अक्षरशः पछाडलेले असून, या मंचाच्या प्रत्येक कलाकारासाठी तीर्थक्षेत्र असणाऱ्या या रंगभूमीची सेवा करण्यासाठी, नाट्य चळवळ कायम ठेवू, असे प्रतिपादन अष्टगंध कला मंचाचे अध्यक्ष अशोक म्हात्रे यांनी केले. अष्टगंध कला मंचाच्या वतीने पाली-परळी येथे कलाकारांसाठी दोन दिवसांच्या सहलीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी अशोक म्हात्रे हे कलाकारांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी अष्टगंध कलामंचाचे सचिव तथा रंगकर्मी दत्तात्रेय घरत, नाटककार हसूराम पाटील नाटककार धनेश्वर म्हात्रे यांनीही कलाकारांना मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी गजानन म्हात्रे (गजाबा) अष्टगंध कलामंचाचे सहसचिव रमेश कोळी, दिगंबर कोळी, रोशन घरत, गजानन ठाकूर, जय किसन मोकल, प्रसाद कडू, चेतन पाटील, प्रज्योत पाटील तसेच अन्य कलाकार उपस्थित होते या आयोजित नाट्य कलाकारांच्या सहलीत खास करून कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी अष्टगंध कला मंचाचे सचिव तथा रंगकर्मी दत्तात्रेय घरत यांच्या सौजन्याने नाट्य कलाकारांना नाट्य सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.







