प्रकल्पग्रस्तांचे स्वप्न पुर्ण करणारः वाघेरे

| उरण | वार्ताहर |

मावळचे विद्यमान खासदारांनी उरण तालुक्यातील जनतेला, प्रकल्पग्रस्तांना आश्वासनापलीकडे काहीच दिले नाही. त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना उरणची जनता त्यांची जागा दाखविणार आहे. त्या जनतेच्या, प्रकल्पग्रस्तांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांचे अधुरे राहिलेले स्वप्न हे नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटीलांच नाव देऊन मी त्यांचा सेवक म्हणून पुर्ण करणार असल्याचा विश्वास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे -पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मावळ मतदारसंघाचे शिवसेना (उबाठा), काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या उरण तालुक्यातील गाव प्रचाराचे आयोजन सोमवारी (दि.6) जासई येथील हुतात्म्यांना अभिवादन करून करण्यात आले. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारार्थ उरण तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या रँलीत शिवसेनेचे मा.आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, आर.सी.घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कामगार नेते संतोष घरत, भावना घाणेकर, शेकापचे युवा नेते प्रितम म्हात्रे, कामगार नेते दिनेश पाटील, भुषण पाटील, हेमलता पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, काका पाटील, महिला प्रमुख सीमाताई घरत, माजी सभापती नरेश घरत, सरपंच संतोष घरत, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शेकापचे तालुका चिटणीस विकास नाईक, शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख दिपक भोईर, कमलाकर पाटील, मार्तंड नाखवा, रमाकांत म्हात्रे, प्रल्हाद कासकर आदिं सह महाआघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी उरणच्या जनतेने महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शवून विजयी भवोचा आशिर्वाद दिला.

Exit mobile version