सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार- महेंद्र घरत

| उरण | वार्ताहर |

शुक्रवार (दि.25) आनंदी हॉटेल, उरण येथे रोजगार आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कामगार नेते महेंद्र घरत यांनी ई-मेलच्या माध्यमातून मुलाखतीसाठी कॉल आलेल्या सर्व बेरोजगार उमेदवारांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या हस्ते नोकरी मिळालेल्या तरुण-तरुणींचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी महेंद्र घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उरणमधील बेरोजगार तरुण-तरुणी यांच्यासाठी मी व युवा रोजगार मंच प्रामाणिकपणे काम करून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचा काम करणार आहोत.

यावेळी रोजगार युवा मंच उरणचे पदाधिकारी, किरीट पाटील, डॉ. मनिष पाटील, प्रकाश पाटील, रोहित घरत, कमलाकर घरत, जयवंत पाटील, संजय ठाकूर, के.डी. कोळी, नंदा कोळी, सदानंद पाटील, निर्मला पाटील, लंकेश ठाकूर, हेमंत ठाकूर, चेतन पाटील, भालचंद्र नाखवा, प्रांजल भोईर, अजित ठाकूर, योगानंद म्हात्रे, विवेक म्हात्रे, आनंद ठाकूर, राजेंद्र भगत, आदित्य घरत, योगेश रसाळ आदी उपस्थित होते. तसेच बेरोजगार तरुण-तरुणी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version