महाराष्ट्र होणार निर्बंधमुक्त?

मुख्यमंत्र्यांची शरद पवारांसह टास्क फोर्ससमवेत चर्चा
मुंबई | प्रतिनिधी |
कोरोनाची साथ आटोक्यात येऊ लागल्याने राज्याचे रुतलेले अर्थचक्र गतीमान करण्यासाठी महाविकास आघाडीने पुढाकार घेतला आहे.यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांशी चर्चा सुरु केल्या आहेत.त्यानुसार सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली.त्यात हॉटेल, चित्रपट, नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदींची उपस्थिती होती .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार बैठकीत खालील मुद्यांवर झाली चर्चा यामध्ये – अवजड वाहनांवरील वाहतूक कर माफ अथवा कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.याशिवाय कोरोनामुळे आणि डिझेल महागाईमुळे अडचणीत असलेल्या वाहतुकदारांना दिलासा कशाप्रकारे देता येऊ शकतो यावरच खल झाला.
हायवेवरील वाहतुक कोंडींवरील उपाययोजना, ट्रक आणि इतर अवजड वाहनांसाठी पार्किंग टर्मिनल उभारणे, याशिवाय हॉटेल्स, मॉल्सला कोोरोना निर्बंध शिथिल करणे आदी निर्णय घेण्यात आले.
दरम्यान, चित्रपटगृहे, नाटयगृहांसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या आहेत. त्यानुसार, चित्रपटगृहे, नाटयगृहे 50 टक्के आसनक्षमतेसह सुरू करण्यास परवानगी असेल. दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवावे, चित्रपटगृहांमध्ये मोकळ्या जागांमध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असून, सिनेमागृहांमध्ये येणार्‍या प्रेक्षकांना मुखपट्टी बंधनकारक आहे.


कोरोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाटयगृहे 50 टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. नाटय कलावंतांसाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत असे ठाकरे यांनी सांगितले आहे.

आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहाना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Exit mobile version