| पाली/गोमाशी | प्रतिनिधी ।
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 76 व्या वर्धापनदिनाच्या पूर्व तयारी निमित्त पाली येथे सुरेश खैरे यांच्या निवासस्थानी पूर्व नियोजन बैठकीचे आयोजन रविवार दि.23 रोजी करण्यात आले होते. यावेळी पाली तालुक्यात होणारा हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार शेकाप नेते सुरेश खैरे यांनी केला.
यावेळी जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, नगरसेवक अलिबाग प्रदीप नाईक, भरत पाटील, संतोष भिलारे, सुधागड तालुक्यातील शेकापचे सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी आदी मान्यवर या बैठकीसाठी उपस्थित होते.
आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर यावर्षी वर्धापन दिनाचे यजमानपद सुधागड तालुक्याला मिळालेले आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडतील. तसेच, जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी यजमान म्हणून आपल्याला घ्यावी लागणार आहे. या वर्षी होऊ घातलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापनदिन महत्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावर्षी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवराज संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्याची संधी सुधागड वासीयांना मिळणार आहे, असे खैरे यांनी सांगितले. या वर्षीचा वर्धापन दिन हा आपल्या सर्वांनसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्ते कसे जमतील हा आपला सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. तरी, सर्वांनी मिळून हा वर्धापन दिन उत्तमरीत्या संपन्न करू. या वर्धापनदिनानिमित्त शेकापक्षाची भूमिका विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचविण्यास मदत होईल. त्यामुळे त्याचा उपयोग या वर्षात होणाऱ्या निवडणुकीत दिसेल, असे नगरसेवक प्रदीप नाईक यांनी सांगितले.