काँग्रेसमध्ये राहणार नाही; कॅप्टन अमरिंदर यांची घोषणा

अमृतसर | वृत्तसंस्था |
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपण भाजपमध्ये जात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच भाजपमध्ये जात नसलो तरी काँग्रेसमध्ये राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता अमरिंदर सिंग काय करणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरु होती. आता त्यावर शिक्कामोर्तब यामुळे झालं आहे.

Exit mobile version