आता गोवरसाठीही क्वारंटाईन सेंटर उभारणार

टास्क फोर्सचे जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश

। मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्यभरात कोरोनानंतर आता गोवरने थैमान घातलं आहे. गोवरची लागण झालेल्यांची संख्या 600च्या वर पोहोचली आहे. दरम्यान, आता गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत.

सध्या राज्यात गोवरच्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं लागण झालेल्यांना क्वारंटाईन करण्याचे निर्देश दिले आहेत. रविवारी संशयित गोवर रुग्णांची संख्या 10 हजार 544 वर पोहोचली आहे. तीन वर्षांपासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे संपूर्ण देशभरात पहिल्यांदा लॉकडाऊन लागल होत. आता पुन्हा क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहे.

गोवरची लागण झालेल्या मुलांना किमान सात दिवसांसाठी विलगीकरणात ठेवावं, असे निर्देश टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत. यासाठी रुग्णालयीन व्यवस्था करण्याचे निर्देशही टास्क फोर्सनं दिले आहेत.

Exit mobile version