हमरापूर | वार्ताहर |
हमरापूर गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी हमरापूर येथे बोलताना व्यक्त केले. हमरापूर ग्रामपंचायतीने 14 वा वित्त आयोग व हमरापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या घंटागाडीच्या लोकर्पण प्रसंगी ना. आदिती तटकरे या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीे पदाधिकारी,शासकीय अधिकारी उपस्थित होते.
हमरापूर गावातील रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला जाईल तसेच सिडकोच्या अधिका-यांशी फेब्रुवारीमध्ये बैठक घेऊ गणेश मूतीर्र्कारांचे नुकसान झाले, कायम स्वरुपी मदत आदेश काढण्याची विनंती आपण शासनाला केली आहे. तसेच पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळाली पाहिजे ही भूमिका असे सांगून गावाच्या विकासासाठी आम्ही सोबत आहोत असे स्पष्ट केले. यावेळी सरपंच प्रदीप म्हात्रे यांनीही आपले विचार मांडले. कोरोनो काळात चांगले काम केलेल्या आरोग्य अधिकारी , आरोग्य सेवक, सेविका, आशावर्कर, मदतनीस, ग्रामशिपाई आदींचा पालकमंत्री े यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
हमरापूरच्या विकासासाठी निधी देणार -पालकमंत्री
