। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमियर लीग 2024आधी मुंबई इंडियन्स संघात झालेला नेतृत्व बदल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईने या आयपीएल हंगामापूर्वी संघाच्या नेतृत्वपदी रोहित शर्माला हटवत हार्दिक पांड्याची नियुक्ती केली. त्यामुळे अनेक चाहत्यांना हा निर्णय पटला नाही. या घटनेनंतर रोहित पुढीलवर्षी मुंबई इंडियन्स संघ सोडणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले. अनेकांनी रोहितने चेन्नई सुपर किंग्स संघात जावे किंवा सरायझर्स हैदराबाद संघात जावे, असंही म्हटले.
त्यातच आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही अस म्हटले आहे की, रोहितने चेन्नई संघात जावे आणि नेतृत्वही करावे. तसेच, बिअरबायसेप्स पॉडकास्टमध्ये बोलताना वॉन म्हणाला, रोहित चेन्नई संघात जाईल आणि धोनीची जागा घेईल? गायकवाड यावर्षी नेतृत्व करत आहे, कदाचित रोहितने पुढीलवर्षी जबाबदारी सांभाळेपर्यंत हा एक मार्ग असू शकतो. मी रोहितला चेन्नईमध्ये पाहातो.
याशिवाय रणवीरने म्हटले की, चाहत्यांसाठी रोहितला नेतृत्वपदावरून काढणे निराशाजनक होते. तसेच, त्याने म्हटले की, रोहित यापूर्वी डेक्कन चार्जर्सकडून खेळला असल्याने तो जर हैदराबाद संघात गेला, तरी आनंदच आहे.