गुणवंतांना सहकार्य करणार- चित्रलेखा पाटील

पाठारे क्षत्रिय समाज; शिक्षण फंड गुणगौरव सोहळा


। अलिबाग । प्रतिनिधी।

ध्येय चिकाटी आणि जिद्द उराशी बाळगून यश पादाक्रांत करणार्‍यांचे नेहमीच कौतुक होऊन ते समाजात गुणवंत आणि यशवंत म्हणून नावारुपाला येतात अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याचे कार्य समाजातील ज्ञानाधिष्ठीतांनी करावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, उर्फ चिऊताई यांनी करुन गुणवंत विद्यार्थ्यांना कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात मदत तसेच मार्गदर्शन करण्याचे आश्‍वासन दिले.

पाठारे क्षत्रिय समाज शिक्षण फंड चौल चंपावती यांच्यातर्फे शनिवारी (दि.17) समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षण क्षेत्रात योगदान असणार्‍या पी.एन.पी. सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई उपस्थित होत्या. यावेळी शिक्षण फंडाचे अध्यक्ष रविंद्र नाईक यांनी चित्रलेखा पाटील यांना पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. इयत्ता बारावी मध्ये वेदांग अनिल राऊत याने 90 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला असून त्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात अकाऊंट विषयात 99 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, इयत्ता दहावी मध्ये प्राप्ती प्रकाश नाईक हिने 96.20 टक्के गुण मिळवून शहरी तर सार्थक सचिन म्हात्रे याने 94 टक्के गुण मिळवून ग्रामीण भागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच, वेदांत विकास घरत, रितेश राजेंद्र घरत, सुष्टी सुधीर ठाकूर, युगांत संदीप म्हात्रे, प्रित जितेंद्र नाईक, रुतू मनोज नाईक आदी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बक्षिस देऊन गौरविण्यात आले. या गुणगौरव कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण फंडाचे अध्यक्ष रविंद्र नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन गोंधळी, राजा ठाकूर यांनी केले. तर, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र नाईक, सचिन म्हात्रे, सचिन गोंधळी, शरद नाईक, गंगेश म्हात्रेे, राजा ठाकूर, सुधीर ठाकूर व सर्व कार्यकारणी सदस्य तसेच सर्व समाज बांधव व पाखाडी प्रमुख यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमासाठी व्यासपीठावर पाठारे क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष रमेश म्हात्रे, शिक्षण फंडाचे अध्यक्ष रविंद्र नाईक, उपाध्यक्ष सचिन म्हात्रे, सचिव सचिन गोंधळी, खजिनदार गंगेश म्हात्रे, महिला मंडळाच्या अध्यक्षा शालिनी नाईक, रेवदंडा अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रभाकर नाईक, नागाव सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच नंदूशेठ मयेकर, चौल माजी सरपंच रुपाली म्हात्रे, देणगीदार विजय म्हात्रे व कुटुंबिय तसेच सर्व समाज कार्यकारिणी सदस्य, शिक्षण फंड कार्यकारणी सदस्य व सर्व पाखाडी प्रमुख उपस्थित होते.

Exit mobile version