जिल्ह्यात ‘डायरेक्ट व्हॉलीबॉल’ला उच्चस्थानी नेणार


चित्रलेखा पाटील यांची ग्वाही
। अलिबाग । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यात डायरेक्ट व्हॉलीबॉल या खेळास उच्चस्थानी नेण्याचे काम करणार असल्याची ग्वाही डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी कृषीवल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या सभेत बोलताना दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशन रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.
त्या पुढे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना आवश्यक असणारी मदत वेळोवेळी केली जाते व यापुढेही ग्रामीण भागातील तरूण व होतकरू खेळाडूंना खेळाच्या माध्यमातून पुढे जाण्याकरिता सर्वतोपरी मदत केली जाईल. डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशन ही संघटना नावारूपाला आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून, सर्वांनी पुढे येऊन डायरेक्ट व्हॉलीबॉल खेळ खेडोपाड्यांत कसा रूजला जाईल याचा विचार करून या क्षेत्रात काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी असोसिएशनचे सेक्रेटरी शरद कदम, उपाध्यक्ष सुनील म्हात्रे, खजिनदार रवींद्र म्हात्रे, सहकार्यवाह रमेश म्हात्रे, हिरामण भोईर, सल्लागार मारूती पाटील, सदस्य रेवन पाटील, अमित जगताप, विक्रम पाटील, संदीप देसाई, पायल देसाई, रशिया वारगुडे व अन्य व्हॉलीबॉल खेळाडू उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार्यवाह रमेश म्हात्रे, तर आभार प्रदर्शन खजिनदार रवींद्र म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version