चौल येथे महिलेस मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

रेवदंडा | प्रतिनिधी |

चौल चुनेकोळीवाडा येथे शेतातून घरी परत जात असताना महिलेचा रस्ता अडवून तिला शिवीगाळ, मारहाण करून विनयभंग केल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौल दादर येथील महिला फिर्यादी या दि. 10 मेे रोजी दुपारी बाराच्या सुमारास चौल चुनेकोळीवाडा येथून शेतातून काम करून घरी परतत असताना आरोपी एक व दोन यांनी त्यांचा रस्ता अडवून अश्‍लील शिवीगाळ करून त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. दरम्यान, आरोपी क्रमांक एक यांनी तिचा उजवा हात खेचला, तर आरोपी क्रमांक दोन यांनी तिचे केस धरून तिला खाली पाडले व हाताबुक्क्याने मारहाण करुन तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले, अशी तक्रार महिला फिर्यादी यांनी रेवदंडा पोलीस ठाणे येथे नोंदविली आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहा. फौजदार प्रमोद देसाई पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version