कोळंबी फार्मवर महिलेला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथील कोळंबी फार्मवर संवर्धनाचे काम सुरू असताना वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. फार्मच्या गेटवर जोरजोरात आवाज करणाऱ्या आरोपीला जाब विचारल्याने त्याने महिलेला शिवीगाळ व धमकी दिली. घटनेचा मोबाईल व्हिडीओ काढल्याचा राग धरून आरोपीने इतर दोघांना घटनास्थळी बोलावून घेतले. तिघांनी मिळून गेटजवळील विटांचे नुकसान केले तसेच लाकडी काठी व हाताबुक्क्यांनी महिलेला मारहाण केली. मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल असून, अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version