| पनवेल | वार्ताहर |
मागील आठ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात असताना पुरुष इसमाने सदर महिलेस घरगुती कारणावरुन वाद घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार उसर्ली गावाच्या हद्दीत घडला आहे. दिप सोसायटी येथे राहणारा इसम हा गेल्या आठ वर्षांपासून एक महिलेसोबत लिव्ह ईन रिलेशनशीपमध्ये राहात असताना घरगुती कारणावरुन वाद घालून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, या रागाच्या भरात सदर महिला ही भावाकडे राहण्यास गेली असता तिला परत घरी बोलावून पुन्हा मारहाण करून तिला गंभीर दुखापत केल्याने याबाबतची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.