| रसायनी | वार्ताहर |
दुर्गामाता काॅलनीतील श्री योग सोसायटीत राहणा-या तनुश्री संकेत ओमले (27) यांनी रविवारी (दि.21) जुलै रोजी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. तनुश्रीने राहत्या सोसायटीतील टेरेसवर ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्यावर चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यु नोंद करण्यात आली, असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.