भीषण अपघात! कारने महिलेला चिरडले

। म्हसळा । प्रतिनिधी ।

म्हसळा-श्रीवर्धन रस्त्यावर झालेल्या भीषण अपघात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 5) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाडंबा फाट्यावर घडला.

किशोरी किसन जावळेकर (वय 42 वर्षे, रा. केरडे) ही महिला दोन दिवसांसाठी श्रीवर्धन येथील माहेरी गेली होती. ती माहेरहून एसटी बसने परत येत वाडंबा बसथांब्यावर उतरली. त्याचवेळी श्रीवर्धन येथील प्राजक्ता प्रशांत गोवलकर ही महिलादेखील उतरली. या दोघीही रस्ता ओलांडत असताना किशोरी हिला म्हसळाच्या दिशेने येणाऱ्या एमएच 03 बीसी 9462 या क्रमांकाची गाडी भरधाव येताना दिसली. ही गाडी आपल्या ठोकणार हे लक्षात येतात किशोरीने प्राजक्ताला हात धरुन बाजूला खेचले. मात्र, प्राजक्ताला वाचवताना किशोरीला त्या वेगवान कारने चिरडले. या अपघात गंभीर जखमी झालेल्या किशोरीचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी सोहम पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version