| रेवदंडा | प्रतिनिधी |
स्वारगेटहून- मुरुडकडे येणाऱ्या एसटी बसने एका महिलेला जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि.18) बारा वाजण्याच्या सुमारास रेवदंडा गोळा स्टॉपजवळ घडली. मृत महिलेचे नाव मथुरा रामचंद्र वरसोलकर रा. बोर्ली असे असून, त्या रस्त्यावरून जात असताना स्वारगेट–मुरुड मार्गावरील एसटी बसने त्यांना धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की मथुरा वरसोलकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, रेवदंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे एसटी महामंडळाच्या बसचालकांच्या गोंधळकारक व निष्काळजी वाहनचालकांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक नागरिकांतही संताप व्यक्त होत आहे.






