| पेण | वार्ताहर |
पेण तालुक्यातील वरेडी गावातील राहणारे दांपत्य शहरात रात्रीच्या सुमारास फिल्म बघून रात्री एक वाजण्याच्या सुमारास अंतोरे पुलावरून घरी जात असताना विवाहित महिलेचा नदिपात्राजवळ तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना (दि.9) मार्च रोजी घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील वरेडी येथे राहणारे प्रशांत चंद्रकांत पाटील (वय25) व त्याची पत्नी स्नेहा प्रशांत पाटील (वय20) हे दांपत्य शहरात सिनेमा पाहण्यासाठी गेले होते.
रात्री सिनेमा पाहिल्यानंतर जवळपास एक वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी वरेडी येथे येत असताना ते मोटारसायकलने अंतोरे पुलाजवळ आले असता मोटारसायकलस्वार प्रशांत याच्या डोळ्यात काहीतरी कचरा गेला असल्याने पत्नी स्नेहा ही खाली उतरून मोबाईल बॅटरीच्या साहाय्याने नव-याच्या डोळ्यातील कचरा पाहत असताना तिचा अचानक तोल जाऊन ती पुलाखालील पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तीच्या नव-याने तिला हात दिला परंतू तोही मोटरसायकल सह खाली पडला त्यावेळी तिथे झालेल्या आरडाओरडा नंतर आलेल्या नागरिकांनी प्रशांत पाटील याच्यासह मोटारसायकल वर काढली मात्र रात्रीचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आजुबाजुला अडकून पडलेल्या स्नेहा पाटीलचा मृतदेह दोन तासानंतर नागरीकांच्या हाती लागला या बाबतची माहिती मिळताच अपघातग्रस्तांचेवाली कल्पेश ठाकूर यांच्यासह पेण पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी त्या ठिकाणी धाव घेतली यावेळी सदर महिलेस उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्या महिलेस मृत घोषित केले याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.







