दोन चिमुकल्यांसह चार महिला जखमी
। जळगाव । वृत्तसंस्था ।
जळगावमध्ये एका भरधाव कारने दोन चिमुकल्यांसह पाच महिलांना धडक दिली आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर, चार महिलांसह दोन चिमुकलेही जखमी झाले आहेत.
मेहरुण परिसरात राज शाळेपासून मंगलपुरीकडे जाणाऱ्या गल्लीत संध्याकाळच्या वेळेस घरासमोर काही महिला उभ्या होत्या, तर काही मुले खेळत होती. त्याचवेळी एक भरधाव होंडा कार येऊन एकामागोमाग एक अशी धडक देत आली. यात पाच महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे. यातील एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, चार महिला आणि दोन लहान मुले जखमी झाली आहेत.
जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केली आहे.







