। पेण । प्रतिनिधी ।
वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 46 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना होती. मृत्यू झालेल्या महिलेचं नाव नलिनी म्हात्रे (47), रा. सागर सोसायटी, घर नं 385, चिंचपाडा, मोतीराम तलावाजवळ, ता. पेण, जि.रायगड असे आहे.
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम चौदा वर्ष होऊन ही पूर्ण झालेले नाही. या महामार्गावर चारशे हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला असून, साडे आठशे हून अधिक निष्पाप नागरिक जायबंदी झाले आहेत. तरी रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी इच्छा कोकणातील मंत्री, खासदार, आमदार तसेच अधिकाऱ्यांना नाही अश्या चर्च्या प्रवासी वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या वडखळ पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या डोलवी गावाजवलीळ पुलावर सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास नलिनी म्हात्रे ता. पेण, जि. रायगड ह्या त्यांच्या ताब्यात असलेल्या टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर गाडी घेऊन रोहा तालुक्यातील कोलाड सुतारवाडी येथे मुलगा वल्लभ यांचे कॉलेजमध्ये पालकाची मिटींग असल्याने जात असताना मौजे डोलवी गावाजवळील पुलाजवळ सकाळी अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत नलिनी म्हात्रे या गाडीवरून खाली पडल्या. त्याचवेळी त्याच्या डोक्यावरील हेल्मेट फुटले आणि डोक्यावरून वाहन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर अज्ञात वाहनचालक तेथून पळ काढला. या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास महिला पोलीस उप निरीक्षक योगिता सांगळे करीत आहेत. अशा प्रकारच्या अपघातांबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस नागरिकांना करत आहेत. या अपघात झाला त्या ठिकाणी जेएसडब्ल्यू कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेरा मध्ये अपघाताचे दृश्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, पोलीस हे जाणीवपूर्वक या कॅमेरे मध्ये कैद झालेले दृश्य घेत नसतील आणि अज्ञात वाहन याला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप डोलवी परिसरातील नागरिकांनी केला आहे.
डोलवी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
