रसायनीत महिलेचा विनयभंग

| रसायनी | प्रतिनिधी ।

रसायनी परिसरात एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली असून, महिला तक्रारदार व आरोपी हे एकाच गावात राहणारे असून एकमेकांचे परिचयाचे आहेत.

तक्रारदार महिला या त्यांच्या घरातील मुलास घेऊन पलंगावर बसलेल्या असताना त्यांच्या गावात राहणारा आरोपी याने तक्रारदार महिलेशी बोलण्याचा बहाणा करुन घरामध्ये प्रवेश केला. महिला तक्रारदार यांच्याशी अश्लील भाषेत बोलून व लगट करण्याचा प्रयत्न करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत महिलेने रसायनी पोलीस ठाण्यात विनयभंगाची नोंद केली आली असून, आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिजीत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद जाधव व तपासिक अंमलदार मपोसई अनुसया ढोणे अधिक तपास करीत आहे.

Exit mobile version