| पनवेल | प्रतिनिधी |
रॅपिडो मोटरसायकलने प्रवास करणाऱ्या महिलेचा चालकाने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी अनोळखी चालकाविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला रॅपिडो ॲपवरून मोटरसायकल बुक करून डोंबिवली येथून उलवे येथे जात होती. प्रवासादरम्यान पडघा, तळोजा एमआयडीसी परिसरात पोहोचल्यानंतर मोटरसायकल चालकाने तिचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. कळंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून अनोळखी चालकाचा शोध सुरू केला आहे.
रॅपिडो प्रवासादरम्यान महिलेचा विनयभंग
