अलिबागमध्ये महिलेचा विनयभंग

|रायगड । जिल्हा प्रतिनिधी


अलिबागमध्ये एका महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी त्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कामावर जात असताना वारंवार त्यांचा पाठलाग आरोपी करीत होता. तसेच 21 जानेवारी ते 21 मे 2026 या कालावधीत त्याने तिचा विनयभंग केला. तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. त्यामुळे आरोपी विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version