। बीड । प्रतिनिधी।
वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. बीड येथील तुपे वस्तीवर मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान दरोडेखोराने सशस्त्र दरोडा टाकला. दरम्यान पती पत्नीला मारहाण करण्यात आली. या घटनेत भागवत तुपे यांच्या डोक्यावर शस्त्राने हल्ला करण्यात आला असून त्यांच्यावर आहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार चालू आहे.
चोरांनी मध्यरात्री शेजारील घरांना कड्या लावून तुपे यांच्या घराचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. भागवत तुपे यांच्या पत्नी सरस्वती तुपे यांच तोंड दाबून मंगळसूत्र काढले त्यावेळी भागवत तुपे यांना जाग आल्यामुळे त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून डोके फोडले. सरस्वती यांच्या पाकिटातील रोख दहा हजार, गळ्यातील तसेच घरातील ठेवलेले २ तोळ्याचे दागिने घेऊन चोर पसार झाले. या संबंधित शिरूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






