महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी

आरोपींवर गुन्हा दाखल
माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथील आदिवासी बांधवांमध्ये किरकोळ कारणास्तव भांडण होऊन यातील फिर्यादी महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या अंगणात व दि.2 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी तीन वाजता खरवली आदिवासीवाडी येथील गावातील फिर्यादी यांच्या घरासमोरील रस्त्यावर घडली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी महिला काळी एकनाथ वाघमारे (39) रा. खरवली आदिवासीवाडी, ता. माणगाव या इंदापूर येथून किराणा सामान घेऊन येत असताना आरोपी राजा वसंत मोरे यांनी शिवीगाळी करून हाताबुक्याने मारहाण करून हातात असलेल्या लाकडी जळाऊ फाट्याने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपी सुरेश जनु काटकर, कळी सुरेश काटकर, राजा वसंत मोरे, सर्व रा. खरवली आदिवासीवाडी, ता. माणगाव यांच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. करे हे करीत आहेत.

Exit mobile version