| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल येथील आदई तलावात अंदाजे साठ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडून आलेला आहे. या महिलेची ओळख पटली नसल्याने खांदेश्वर पोलीस तिची ओळख पटवत आहेत. ही मृत महिला निम गोरी, केस लांब पांढरे, अंगावर चॉकलेटी रंगाची पांढरे लहान चेक्स असलेली साडी, पोपटी रंगाचा ब्लाउज परिधान केलेला आहे. गळ्यात तुळशीची माळ असून काळी मन्याचे लहान डोरले, कानात फुले, नाकात मुगवट आहे. तिच्या दोन्ही हातावर फुलाची डिझाईन असलेले मोठे गोंदण आहे. या मृत महिलेच्या नातेवाईकाचा घेण्यात येत असून, कोणास काही माहिती मिळून आल्यास त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक संजय परशकर (मोबाईल- 9923709599) यांनी केले आहे.
आदई तलावात महिलेचा मृतदेह आढळला
