महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ही अज्ञात चोरट्यानी खेचून पसार झाल्याची घटना घडली आहे. कर्जत पोलीस ठाण्यात या अज्ञात चोरटयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जतमधील म्हाडा कॉलनी घर. नंबर 119 येथे राहणाऱ्या महिला या बुधवारी (दि.20) कर्जतमधील अंबा माता मंदिरातील आरती संपल्यानंतर पायी चालत आपले राहाते घरी निघाल्या असताना, या संध्याकाळचे आठ वाजण्याच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील अंतर्गत रस्त्यावर आल्या. त्यांच्या पाठी मागे असलेल्या एक लाल रंगाचा जॅकेट सारखे घातलेला अनोळखी व्यक्तीने महिलेच्या गळ्यात असलेली एकूण 65 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची घटना घडली. या घटने संदर्भात महिलेने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार देताच कर्जत पोलीस ठाण्यात संबंधीत पसार झालेल्या अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चेन स्नेचिंग घटनेचा तपास हा कर्जत पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरिक्षक वरक हे करीत आहे. कर्जतमध्ये या आधी काही महिन्यापूर्वी महाविर पेठेतील चेन स्नेचिंगची घटना तर घरफोडी चोरीच्या घडणार्‍या घटनांमुळे कर्जतमध्ये नागरी सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे का? व अशा गुन्ह्यांवर कर्जत पोलीसांचा अंकुश राहाणार का? असे प्रश्न मात्र कर्जतकरांकडून उपस्थित केले जात आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version