अनधिकृत बांधकाम थांबण्यासाठी महिलेचा उपोषणाचा इशारा

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील विहूर बौद्धवाडी येथील रंजना तांबे यांचे गावठाण जमीन क्रमांक 156 ब येथे स्वतःचे घर आहे. त्यांच्या घराच्या शेजारीच मोनिश तांबे व महेंद्र तांबे यांचे घर असून ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता व दोन घरामधील अंतर न सोडता तांबे यांच्या घराला अगदी चिकटून बांधकाम सुरु केल्याने हे बांधकाम थांबावे व त्यांच्यावर कार्यवाही व्हावी यासाठी तांबे यांनी 18 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयाजवळ उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. सदरचे बांधकाम थांबावे यासाठी रंजना तांबे यांनी मुरुड तहसीलदार, गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत विहूर यांना पत्रव्यवहार करून सुद्धा सदरचे बांधकाम थांबलेच नाही. विहूर ग्रामसेवक यांनी तहसीलदार यांच्या पत्रानंतर संबंधितांना बांधकाम थांबवण्याची नोटीस दिली. परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन कोणतीही कार्यवाही केली नाही. सदरचे बांधकाम तातडीने थांबवा अन्यथा 18 ऑक्टोबरपासून त्यांनी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. सदरचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार मुरुड, मुरुड पोलीस निरीक्षक याना निवेदनाच्या प्रति दिल्या आहेत.आहे. प्रशासन हे उपोषण सोडवणार कि नाही हे येत्या काळात दिसून येणार आहे.

Exit mobile version