| पनवेल । वार्ताहर ।
मंगळूरू येथून मत्स्यगंधा एक्स्प्रेसने मुंबईत येणार्या 64 वर्षीय महिलेची रोख रक्कम, मोबाइल फोन असलेली पर्स अज्ञात लुटारूने धावत्या एक्स्प्रेसमधून खेचून पलायन केल्याची घटना पनवेल रेल्वे स्थानकाजवळ घडली. रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोपरखैरणे गावात राहणार्या मेर्टालडा नडोना (64) मंगळुरू येथून मत्स्यगंधा एक्स्प्रेसने येत होत्या. सदर एक्स्प्रेस पनवेल रेल्वे स्थानकाजवळ आली असताना, नडोना कुटुंबीय उतरण्यासाठी सामान घेऊन दरवाजात उभे होते. यावेळी गाडीचा वेग कमी झाल्याने एका चोराने दरवाजात उतरण्यासाठी उभ्या असलेल्या मेटलिडा नडोना यांच्या खांद्याला अडकवलेली पर्स खेचून पलायन केले.