दारुचे धंदे विरोधात महिला आक्रमक

मुरुड तहसीलदारांना दिले निवेदन
। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यातील उसरोली बेलिवाडी भागात दारू धंद्यामुळे घरातील लहान मुलांना व्यसन लागले आहे. कामधंदा न करता घरातील माणस दारू पिऊन त्रास देत आहे. भावी पिढी बरबाद होत असल्याने येथील दारुचे धंदे बंद करण्यासाठी महिलांनी मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांना निवेदन सादर केल आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, उसरोली- बेलिवाडी येथे दारुचा धंदा असून आमच्या गावातील सर्व पुरूष व लहान मुले दारू पित आहेत व घरच्यांना त्रास देत आहेत. दारू पिऊन घरी भांडणे व मारहाण करतात. कुठेही कामधंदा करत नाही, घरातील धान्य विकतात, वस्तु विकतात. तरी आमच्याकडे आपण लक्ष द्यावे व दारूचा धंदा लवकरात लवकर बंद करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी नितेश पाटील, अभि पाटील व महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version