महिला क्रिकेटपटू साक्षी लाडचा सत्कार

कर्जत तालुक्यातून पहिल्यांदाच महिला खेळाडूची निवड
कर्जत । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्याच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघात दहिवली येथील साक्षी विलास लाड या महिला क्रिकेटपटूची निवड करण्यात आल्याने गावकीकडून तिचा सत्कार करण्यात आला.साक्षीच्या रूपाने कर्जत तालुक्यातून महिला क्रिकेटपटूची निवड होणे ही कर्जतच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. दहिवलीमध्ये साक्षीच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी प्रास्ताविकात, खरे तर क्रिकेट हा सर्वांचाच आवडीचा खेळ आहे. मात्र मुली त्यामध्ये करियर करतात हे चांगले आहे. दहिवली गावातून पहिल्यांदाच एक महिला क्रिकेटपटू उदयास येत आहे.त्या साक्षीला गावकीकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.फ असे स्पष्ट केले.याप्रसंगी साक्षीचा क्रिकेट किट गणवेश देऊन माजी आमदार लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना माजी आ. लाड यांनी, हल्लीच्या मुलांना अन्न, वस्त्र निवार्‍या बरोबरच क्रिकेटची सुद्धा आवश्यकता भासते.या खेळाकडे लक्ष केंद्रित करून आपल्या गावचे नाव उंचवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. साक्षीने आपल्या मनोगतात, मआता माझी जबाबदारी वाढली असून मला आता चांगला खेळ करावा लागेल.फ असे स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार सुरेश लाड, माजी नगराध्यक्ष शरद लाड, दत्तात्रेय लाड, शिरीष दिघे,संदेश गुरव, नंदू लाड, लक्ष्मीकांत लाड, ऋषिकेश दाभाड़े, तुषार देशमुख, जहीर खान आदी उपस्थित होते.

Exit mobile version