पाली, तळा, पोलादपूर, खालापूरमध्ये महिला नगराध्यक्षा विराजमान

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष,उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या.पाली,तळा,पोलादपूर,खालापूरमध्ये महिला नगराध्यक्षा विराजमान झाल्या आहेत.
पाली, तळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव आणि म्हसळा नगरपंचातींच्या सार्वत्रिक निवडणुका दोन टप्प्यात गेल्या महिन्यात घेण्यात आल्या होत्या.या सर्व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यपदाची निवडणूक गुरुवारी (10 फेब्रुवारी) घेण्यात आली.


पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या गीता पालरेचा तर उपनगराध्यक्ष पदी शेकापचे आरिफ मणियार यांची बिनविरोध निवड झाली आहे. माणगावमध्ये विकास आघाडीचे शिवसेनेचे ज्ञानदेव पवार तर उपनगराध्यक्षपदी सचिन बोंबले विराजमान झालेले आहेत. तळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.त्यामुळे तेथे अस्मिता भोरावकर, नगराध्यक्ष चंद्रकांत रोडे उपनगराध्यक्षपदी बिनविरोध विजयी झालेले आहेत. म्हसळ्यातही राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, तेथे असहल कादिरी नगराध्यक्ष तर सुनिल शेडगे उपनगराध्यक्ष म्हणून निवडूण आलेले आहेत.
खालापूरमध्ये शिवसेनेच्या रोशन मोडवे नगराध्यक्षपदी तर राष्ट्रवादीचे राजेश पार्टे उपनगराध्यक्षपदी निवडूण आलेले आहेत. पोलादपूर नगराध्यक्षपदी शिवसेेनेच्या सोनल गायकवाड तर उपनगराध्यक्षपदी नागेश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Exit mobile version