तहसीलदार आयुब तांबोळी यांचा सल्ला
| रसायनी | वार्ताहर |
प्रत्येक स्त्री ही संसाराचा पाया आणि कळस असल्याने सर्वप्रथम आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाचे कौतुक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले. ग्रुप ग्रामपंचायत चौक सरपंच रितु सुधीर ठोंबरे आणि ग्रामपंचायत चौक यांनी महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ग्रामपंचायत आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमात साक्षी संजय शिंदे यांनी पैठणी जिंकण्याचा मान मिळवला, तर लकी ड्रॉ विनर चंद्रा भाऊ पारधी या ठरल्या आहेत.
जागतीक महिला दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत चौक यांनी महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. माझी वसुंधरा, शून्य कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन यावर मार्गदर्शन केले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते, तर सायंकाळी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम इरसालवाडी कॅम्प येथे सेलिब्रिटी सुमेधा निम्हण यांच्या उपस्थितीत झाला. खेळ रंगला पैठणीचा या खेळात दहा प्रकारचे महिलांचे खेळ होते, यात प्रामुख्याने व्यायाम खेळ होते. उपस्थित सर्व महिलांनी पुरेपूर खेळांचा आनंद लुटला.
दरम्यान, 19 जुलै 2023 रोजी इरसालवाडीची दुर्घटना घडली. त्याच कॅम्पवर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम झाल्याने तेथील महिलांनी आनंद व्यक्त केला. तेथीलच एक महिला लकी ड्रॉ विजेती ठरली, त्यांना कुलर मिळाला. एकूण चाळीस पारितोषिक वितरण करण्याबरोबर उपस्थित प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाला भाजपा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, ग्रामविकास अधिकारी एस.पी. जाधव, उपसरपंच राजन गावडे, सुभाष पवार, निखिल मालुसरे यांच्यासह महिला सदस्य प्राची दबके, लक्ष्मी वाघ, विधिज्ञ रिना सोनटक्के, नयना झिंगे, पूजा हातमोडे, सुवर्णा राणे, ऋशाली पोळेकर, अश्विनी म्हात्रे, स्वाती देशमुख, कार्यालयीन अधीक्षक सुनीता मालुसरे यांच्यासह अनेक महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.






