झेप फाऊंडेशनतर्फे नारीशक्तीचा सन्मान

| भाकरवड | जीवन पाटील |
महिला दिनाचे औचित्य साधून आंबेपूर येथील झेप फाऊंडेशनच्यावतीने मंगळवारी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा स्व.सुलभाकाकू पाटील पुरस्काराने यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन जय मंगल कार्यालय पांडवादेवी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी नगराध्यक्षा सुनीता नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख आशाताई शिंदे, माजी आ.पंडित पाटील, अर्बन बँक चेअरमन सुप्रिया पाटील, जि.प.सभापती अ‍ॅड.निलिमा पाटील, जि.प.गटनेते अ‍ॅड.आस्वाद पाटील, सदस्या भावना पाटील, पं.स.सभापती प्रमोद ठाकूर सदस्या रचना म्हात्रे, नगरसेविका वृषाली ठोसर, नगरसेविका संजना किर, शिंदे मॅडम, अ‍ॅड. प्रसाद पाटील उपस्थित होते
झेपच्या अध्यक्षा चित्रा पाटील यांनी प्रास्ताविकातून महिला दिनाचे महत्व विषद करताना नारीशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी झेपतर्फे सुलभाकाकू पाटील पुरस्काराने महिलांचा सन्मान केला जात असल्याचे सुचित केले.
यावर्षी अ‍ॅड. नीलिमा पाटील (राजकीय),डॉ कविता राणे (पत्रकारिता), भावेश्री वाळंज (शैक्षणिक ), सुवर्णा वार्डे (उद्योजिका), स्मीता सहस्त्रबुद्धे (साहित्यिक), रिद्धी म्हात्रे वृत्तनिवेदिका यांना सुलभा पाटील महिला गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारती दीदी आणि पूर्वा पाटील यांचा झेप फाउंडेशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यामध्ये ग्रामपंचायत पेझारी, ग्रामपंचायत मान तर्फे झिराड, ग्रामपंचायत सासवणे, ग्रामपंचायत वाघोडे या नवनिर्वाचित सदस्य महिलांचा सन्मान करण्यात आला तर शिखर प्रभाग संघ कुर्डूस विभाग पदाधिकारी यांचा स.व. समुह संसाधन व्यक्ती या 25 महिलांना सुद्धा सन्मानीत करण्यात आले. सूत्रसंचालन ज्योती घरत यांनी केले.

Exit mobile version