महिलांनी आरोग्याची हेळसांड करू नये; जयश्री काळे

| आगरदांडा | प्रतिनिधी |
महिला सक्षमीकरणाची सर्व स्तरावरून अपेक्षा व्यक्त होत असून, महिलादेखील आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कुटुंबाची चिंता वाहत असताना त्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याचे विशेषतः ग्रामीण भागात आढळून येत आहे. तेव्हा महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अदाणी फाऊंडेशनच्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे यांनी केले. जयश्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मुरुड व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला मुरुड तालुक्यातील पतसंस्थांमधील महिला संचालिकांचा सत्कारप्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

यावेळी सहकार भारती रायगड जिल्हा संघटक दिलीप पटेल, जय श्रीराम पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रा. एम.एस. जाधव, सचिव सुनील विरकुड, कोषाध्यक्ष बाळकृष्ण कासार, संचालक प्रमोद उपाध्ये, सरव्यवस्थापक संजय ठाकूर, उमेश भायदे, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, कोर्लई सरपंच राजश्री मिसाळ, उमरोटकर, अनघा चौलकर आदी उपस्थित होत्या. यावेळी जयश्री काळे यांच्या हस्ते कालभैरव पतसंस्थेच्या संचालिका स्नेहा पाटील, उषा खोत, महात्मा फुले पतसंस्थेच्या संचालिका अनघा चौलकर, सायली गुंजाळ, मर्चंट सोसायटीच्या वासंती उमरोटकर, नगमाना खानजादा, कोलई ग्रामीण बिगर शेती संस्थेच्या राजश्री मिसाळ, मरीना मार्तीस, दुम निका वेगस, आदर्श पतसंस्थेच्या सुप्रिया राजपूरकर, मुरुड माध्यमिक पतसंस्थेच्या रचना वार्डे, नीलम अंबाजी, जयश्रीराम पतसंस्थेच्या जयश्री जोशी, अश्‍विनी पाटील या महिला संचालिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सहकार भारतीची पुस्तिका देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्‍विनी पाटील यांनी तर आभारप्रदर्शन जयश्री जोशी यांनी केले.

Exit mobile version