महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर

| तळा | वार्ताहर |

भारतीय बौद्ध महासभा, रायगड जिल्हा दक्षिण विभाग अंतर्गत तालुका शाखा तळा येथे शुक्रवारी (दि.08) नालंदा बुध्दविहार, मालूक येथे पाच दिवसीय आणि तळा शहर येथे 10 दिवसीय महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन अस्मिता जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी भीमराज जाधव, विजय जाधव, रत्नमाला जाधव, मनिषा मोरे, संगीता मोरे, अनिता शिर्के, सारिकात नाक्ते, संतोष जाधव, नितीन मोरे, विजय जाधव, भीमराज जाधव, प्रकाश गायकवाड, सुरेश साळवे, नरेश मोरे, अर्चना पवार, नागराज पवार, महादेव जगताप, रामदास शिंदे, सुरेन्द्र शेलार, मनोहर गायकवाड, बाळकृष्ण लोखंडे, मंगेश मोरे, लक्ष्मण नाक्ते, मालूक व तळा ग्रामस्थ तसेच, महिला मंडळ, संपूर्ण तालुका कार्यकारिणी व महिला शिबिरार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सदरचा शिबिर उदघाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी तळा तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी, सभासद बंधू भगिनी यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकाश गायकवाड यांनी केले.

Exit mobile version