पोटगी मंजूर होऊन मिळत नसलेल्या महिलांची पोलिस अधीक्षकांकडे धाव

बीड | प्रतिनिधी |
कौटुंबिक हिंसाचारतून विभक्त झालेल्या महिलांना उदरनिर्वाहासाठी शासनाने कायद्यानुसार पोटगीची तरतूद केली आहे मात्र अनेक प्रकरण असे आहेत की गेली दहा ते पंधरा वर्षांपासून पोटगी मंजूर होऊन देखील समंधीत महिलेचे पती पोडगी भरत नसल्याने या मागणीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठानच्यावतीने बीड पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आल आहे.
प्रलंबित असेली असलेल्या पोटगी संबंधित महिलांना मिळवून द्यावी,अन्यथा पोलीस आधिक्षक कार्यलयासमोर आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठानच्या वतीने बीडचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवाड यांना हे निवेदन सादर करण्यात आले आहे.यावेळी शेकाप नेते ई मोहन गुंड, अशोक रोडे,राणी बावणे,वैशाली आरण,ाशा चाटे, रुक्मीणी मुंडे,मनीषा केदार,कविता कदम, सुलभा जावळे, मंगल साळुंके अश्‍विनी मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.या निवेदनाच्या प्रती महिला व बालविकास मंत्री,समाज कल्याण मंत्री, महिला आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Exit mobile version