महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरबाबत जनजागृती बाईक रॅली

| पनवेल | वार्ताहर |
रोटरी क्लब व इनरव्हील क्लब पनवेलच्या वतीने पनवेलमध्ये महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरबाबतीत जनजागृती बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी अर्चना ठाकूर यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीच्या अध्यक्षा ध्वनी तन्ना, मेन्टोर क्लबचे हर्मेश तन्ना, सिम्पल आचालिया, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीच्या अध्यक्षा हेतल बालड, सचिव गीरा चव्हाण, बिजल मीराणी, ममता ठाकूर, डॉ. फोरम ठक्कर, डॉ. वैभव ठक्कर यांच्या उपस्थितीत या रॅलीची सुरुवात झाली.
महिलांना आपण अनेकदा अशा गंभीर आजाराने पीडित पाहतो. त्यांना या आजाराचा सामना करताना औषधोपचारासह मानसिक आधार व हिम्मतीची गरज असते. अशा रॅलीमुळे सर्वांना याचे गांभी कळेल, असे मत अर्चना परेश ठाकूर यांनी व्यक्त केले. शहरात झालेल्या या रॅलीमुळे सामान्यांना या विषयाची माहिती मिळाली. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.

Exit mobile version