| रसायनी | वार्ताहर |
मानवी हक्क संरक्षण फेडरेशन आणि केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या एकदिवसीय बॉक्स क्रिकेट स्पर्धेत सर्व वयोगटातील महिलांनी उत्साहात सहभाग घेतला. 18 ते 58 या वयोगटातील महिलांनी क्रिकेटचा अनुभव घेतला आणि खेळाच्या या उत्साही मैदानावर आपली उपस्थिती नोंदवली. स्पर्धेची उद्घाटन सोहळा पोलिस पत्नी समाजसेविका रत्नप्रभा गोमासे यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील क्रिकेट सामना तरुणाईत नवीन ऊर्जा भरून गेला. अनेक सामने अत्यंत प्रतिस्पर्धी पद्धतीने खेळले गेले. या स्पर्धेत काही महिलांनी पहिल्यांदाच क्रिकेट खेळण्याचा अनुभव घेतला.
स्पर्धेत दहा संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेतापद मैत्री ग्रुप पनवेल यांनी तर उपविजेतापद हरमनी स्पोर्ट्स क्लब यांनी मिळवले. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके आणि चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू, फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर अशा विविध श्रेणींमध्ये पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमास पनवेल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन इक्बाल काझी, उद्योजक अस्लम मुंशी, माजी नगरसेवक मुकिद काझी, उद्योगपती नविद पटेल, आशा की किरण फाउंडेशनचे चेअरमन बशीर कुरेशी, नुरजहा कुरेशी, उद्योजक मुद्दासिर पटेल, रॉयल गार्डनचे मुज्जमिल ठाकूर, उद्योजक जितेंद्र खैरे, तमिम मुल्ला, हमीद शेख, तमिम सर, खलील तांबोळी, शहबाझ पटेल, राजेश्री कदम आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. हा कार्यक्रम लाईव्ह ठेवण्यात आला होता. नारी शक्ती चषक 2024 हा महिलांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येण्याची आणि आपली क्षमता प्रदर्शित करण्याची एक उत्तम संधी ठरला. हे कार्यक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक एकमहत्त्वपूर्ण पाऊल आहे.अशा प्रकारच्या स्पर्धा महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत करतात. या स्पर्धेचे आयोजन मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज नागे, शाहरुख खान, इरफान तांबोळी, नाशिद देशमुख आदींनी परिश्रम घेतले.