नागाव हायस्कुलमध्ये महिला दिन साजरा

। अलिबाग । वार्ताहर ।
नागाव हायस्कुलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुलींसाठी स्वसंरक्षणासाठीची प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक ए.जी.पाटील यांनी करून कार्यक्रमाची सुरूवात केली. या कार्यक्रमासाठी सिकई मार्शल आर्ट रायगड जिल्ह्याच्या सेके्रटरी व राष्ट्रीय पंच लाठी असोसिएशनच्या रायगडच्या सेके्रटरी तसेच कराटेच्या प्रशिक्षिका प्रियांका गुंजाळ उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये शाळेच्या शिक्षिका सुप्रिया पाटील यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रियांका गुंजाळ यांनी खेळाचे महत्व व स्वसंरक्षणाची गरज स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंजूषा पाटील यांनी तर सूत्रसंचालन जान्हवी बनकर यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक चोरगे, गिरी, कासार, तनिष्का नाईक, वर्षा पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होता. यावेळी मैदानावर प्रत्यक्ष प्रात्याक्षिके दाखविण्यात आली व मुलींना यातून स्वसंरक्षणाचे धडे मिळाले. यामध्ये लाठी बचाव तसेच स्वरक्षणासाठी प्रात्याक्षिके दाखविण्यात आली.

Exit mobile version