उरण येथे महिला दिन सप्ताह उपक्रम

| चिरनेर | वार्ताहर |
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरण यांच्यावतीने महिला दिन सप्ताह उपक्रम राबविण्यात आला. दि. 8 ते 14 मार्चपर्यंत हा सप्ताह उप्रकम राबविण्यात आला. 8 मार्च रोजी सकाळी 7 वाजता विमला तलाव येथील मॉर्निंग कट्टा ग्रुप सोबत महिला दिन साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष अफषा मुकरी होत्या. मॉर्निंग कट्टाच्या वतीने महिलांना पुष्पगुच्छ देऊन महिला दिन साजरा केला. त्याच दिवशी गाडे हॉस्पिटलमध्ये ज्या महिलांना मुली जन्माला आल्या, त्यांचा नवजात कन्यारत्न म्हणून सन्मान करण्यात आला. त्या कार्यक्रमाच्या कार्याध्यक्ष चंदा मेवाती होत्या.

9 मार्च रोजी वहाळ येथील गोरक्षनाथ मंदिरात भाविकांसाठी असलेल्या भंडार्‍यासाठी धान्य वाटप आणि देणगी देण्यात आली. कार्यक्रमाच्या कार्यध्यक्ष शिल्पा शेडगे होत्या. 10 मार्च उरण येथील पिरवाडी आदिवासी वाडीतील मुलांना पौष्टिक खाऊ वाटप केले. कार्यध्यक्ष अश्‍विनी धोत्रे यांनी केले. 11 मार्च रोजी विमला तलाव येथे सकाळी योग साधना कार्यक्रम घेऊन योगाचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाचे कार्यध्यक्ष स्मिता पाटील होत्या. 12 मार्च रोजी उरण नगरपरिषदचे महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी उरण शाळा क्रमांक 1 व 2 शाळेत सर्वांसाठी मोफत नेत्र तपासणी चिकित्सा शिबीर व महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले.कार्याध्यक्ष प्रियांका पाटील होत्या. 13 मार्च रोजी सी.बर्ड विशेष मुलांची शाळा येथे व्यायामासाठी उपयुक्त साहित्य वाटप केले. कार्यध्यक्ष अर्चना पटेल होत्या. 14 मार्च रोजी उरण नगरपरिषदचे महाराष्ट्र भुषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी कन्या शाळा क्रमांक 1 व 2 उरण शाळेत शैक्षणिक वस्तू व खाऊ वाटप केले. कार्याध्यक्ष गीता पवार होत्या.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी उरण महिला सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरण संस्थापकीय अध्यक्षा गौरी देशपांडे, महिला मेळाव्याच्या कार्याध्यक्षा गौरी हेमंत मंत्री, सचिव निशा शिरधनकर, खजिनदार अ‍ॅड. वर्षा पाठारे, कल्याणी दुखंडे, प्रमिला गाडे, दिपाली शिदे, सीमा घरत, निलिमा थळी, अफशा मुकरी, प्रगती दळी, दिपा मुकादम, नाहिदा ठाकूर, ज्योत्स्ना येरुणकर, संगीता पवार, शुभांगी शिंदे, संध्याराणी ओहोळ, अनिता कोळी, प्रियांका पाटील, गीता पवार आदींनी मेहनत घेतली.

Exit mobile version