महिला कबड्डी संघाची राज्यस्तरीय स्पर्धेत झेप

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुका आदिवासी संघटनेच्या महिला युनिटकडून महिला कबड्डी संघ कार्यरत आहे. या संघाने जोरदार कामगिरी करीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेपर्यंत झेप घेतली आहे. आदिवासी संघटना कार्यरत असताना तालुक्यात कर्जत तालुका संघटनेच्या आदिवासी महिला संघटनांनी क्रांती ज्योती आदिवासी महिला संघ तयार केला आहे. तालुक्यातील क्रीडा ज्योती महिला कबड्डी संघाने धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे सहभाग घेतला होता.

एकल महीला संघटना आयोजीत महाराष्ट्र राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभाग घेऊन महिला आदिवासी संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारत सामन्यात एका गुणांनी उपविजेता संघ ठरला.

क्रांती ज्योती कर्जत आदिवासी महिला संघाचे संघ प्रशिक्षक जिजा दरवडा, अमोल केवारी, नेहा केवारी यांनी तालुक्यातील गावोगावी जावून कबड्डीमधील चुणूक असलेल्या महिला खेळाडू यांना हेरून हा संघ बांधला. या महिला कबड्डी संघात कविता दरवडा धोत्रेवाडी, आशा हिंदोळा भक्ताची वाडी, सारिका पादीर शिलारवाडी, अलका शेंडे शिलारवाडी, संगीता सांबरी शिलारवाडी, दर्शना भगत भक्ताचीवाडी, बेबी सांबरी शिलार वाडी, रंजना दरवडा धोत्रेवाडी, ललिता पादीर शिलारवाडी असा संघ आहे. संघटनेच्या अध्यक्ष इंदू केवारी, उपाध्यक्ष रंजना दरवडा, सचिव जीजा दरवडा, खजिनदार प्रमिला पािदिर यांच्या माध्यमातून संघ निवड झाली आहे.

Exit mobile version