महिला कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम

। अलिबाग । वार्ताहर ।
माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग.तटकरे महाविद्यालय, माणगांव महिला विकास कक्ष आणि अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय माणगांव यांच्या संयुक्त विद्यमानेविधी महाविद्यालयातील मुटकोर्ट येथे महिला कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन द.ग.तटकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम.खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षप्रमुख प्रा.संगिता उतेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधिश प्रिया बनकर तसेच अ‍ॅड. सदफ येलूकर यांचेसह प्रा. अमरिन अडकर, अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय प्राचार्या अ‍ॅड. शमापरविन फारूकी, उप प्राचार्या अ‍ॅड. सना फातीमाथुल तसेच महिला विकास कक्षातील सर्व सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी प्रिया बनकर यांनी आपल्या मार्गदर्शनात स्त्रियांना वडीलोपार्जीत संपत्तीत समान हक्क, कायदयामध्ये होणारे बदल, स्त्रियांच्या आत्महात्या, घटस्फोटानंतर मिळणारी पोटगी व त्यासंदर्भातील फायदे व कायदे कोणते यासंदर्भात माहिती दिली. तसेच मुलींची छेड काढलीतर कशाप्रकारे कारवाई होवू शकते हे सांगीतले तसेच सामाजीक कायदे, गुन्हेगारी कायदे तसेच विविध कायदयांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सफा ठानगेे तर आभारप्रदर्शन अ‍ॅड. शमापरविन फारूकी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मेहरीन डावरे, प्रा. वृषाली सालस्कर, प्रा.अमिना राउत, प्रा. पुजा साखरे, प्रा. युगंधरा मेथा, प्रा. सबरिन लोखंडे, प्रा.सुमय्या अनसारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version