कुडली येथे स्त्री मुक्तीदिन साजरा

| सुतारवाडी | वार्ताहर |

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जीवनावर शिक्षिका सुचेता रामधरणे यांनी यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थीनी सोनाक्षी शिर्के, सोनाक्षी धोंडगे, स्वप्नाली पडवळ, सई चव्हाण, दिव्यांशू तुपे, वीरा कामथेकर आदी विद्यार्थ्यांनी सावित्राबाई फुले यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. तर पदवीधर शिक्षक मोहन राठोड, अनिल नागरगोजे यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले वेशभूषा करून आल्या होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार अनिल नागरगोजे सरांनी केली.

Exit mobile version