| खांब | वार्ताहर |
कोलाड येथे स्नेह महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शिका अनुराधा म्हात्रे, राऊत, गांधी, कुर्ले, अविनाश म्हात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. अध्यक्ष मारूती राऊत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आरोग्याची काळजी आपण कशी घ्यावी आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्यात पन्नासहून अधिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. कार्याध्यक्ष प्रवीण गांधी यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.