टीव्हीएस युरोग्रिपच्या ब्रन्च ॲन्ड बायकिंग या विशेष उपक्रमामध्ये महिलांचा सहभाग

। मुंबई । वार्ताहर ।
26 फ़ेब्रुवारी, 2023: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत, टीव्हीएस युरोग्रिप टायर्सद्वारे मुंबई मधील महिला बायकर्सकरिता ब्रन्च ॲन्ड बायकिंग नामक रायडिंग उपक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामधून स्त्रीत्वाचा सम्मान करित, महिला सुरक्षितता आणि समानते बाबतीत जागरूकता निर्माण करण्याचा एक प्रयत्न करण्यात आला. शहरातील उत्साही महिला बायकर्सनी या राईडमध्ये सहभाग घेतला होता. ऐश्वर्या पिसे या व्यावसायिक रायडरने या कार्यक्रमास हिरवा झेंडा दाखविला. कार्यक्रमाची सुरवात ही चेंबुरच्या गांधी मैदानामधून करण्यात आली.

विविध वयोगटातील महिलांनी या राईडमध्ये विविध 2-चाकींसह भाग घेतला, त्यांच्यातील सद्भावना आणि आनंद हा अगदी बघण्यासारखा होता. एक तासाची ही राईड खारघर गोल्फ़ कोर्स, खारघर, नवी मुंबई येथे संपली जिथे रायडर महिलांकरिता विविध कार्यक्रमांसह सुरक्षित वाहन चालविण्या संबंधित एक चर्चा सत्र घेण्यात आले. सगळ्या महिला रायडर्संना धन्यवाद देताना, पी.महादेवन, कार्यकारी उपाध्यक्ष – विक्री आणि विपणन, म्हणाले, “आपल्याकरिता, आतंरराष्ट्रीय महिला दिवस हा फ़ार महत्वाचा असून या दिवशी स्त्रीत्वाचा सम्मान, त्यांच्या यशोगाथेच्या कौतुकासह करणे फ़ार महत्वाचे असते. सगळ्या रायडर महिलांमधील ऊर्जा आणि उत्साह हा बघण्यासारखा होता. आठ यशस्वी कार्यक्रमांनंतर टीव्हीएस युरोग्रिपच्या फ़्लॅगशिप कम्युनिटी रायडिंग प्रॉपर्टीचा – ब्रन्च ॲन्ड बायकिंग, हा महिला दिन विशेष उपक्रम खरंच महत्वाकांक्षी, धडाडीचा आणि प्रगतीशील महिलांकरिता एक मानवंदना ठरला. या कार्यक्रमाच्या वेळेला, सुरक्षितता राखण्याकरिता, 2-चाकी मेकॅनिक, रूग्णवाहिका/ऑन कॉल डॉक्टर आणि प्रथमोपचार साहित्यासह सेवा सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले होते.

टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेड बद्दल थोडक्यात
टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेड, टीव्हीएस युरोग्रिप आणि युरोग्रिप टायर्स या ब्रॅन्डचे भारतातील प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार असून आमच्याकडे दुचाकी, तीन-चाकी तसेच ऑफ़-हायवे टायरची निर्मीती केली जाते. 1982 साली सुरू झालेल्या या कंपनीची वाढ ही टीव्हीएस मोबिलिटी क्षेत्रात , 2 बिलियन अमेरिकी डॉलर- एवढी आहे. जागतिक संशोधन आणि विकसनशील क्षमतांसह आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, टीव्हीस श्रीचक्रद्वारे ऑटोमोटिव विभागाकरिता बाजारातील- अग्रगण्य अशा टायर्सची निर्मीती ही भारतासह जगभराकरिता केली जाते. आपले मुख्यालय हे मदुराई येथे असून, टीव्हीएस श्रीचक्रच्या उत्पादन सुविधा या मदुराई(तमिळनाडू) आणि रुद्रापुर (उत्तराखंड) येथे आहेत जिथे महिनाभरामध्ये 3 मिलियन क्षमतेच्या टायर्सची निर्मीती केली जाते.

कंपनीचे डिझाईन सेंटर हे मिलान, इटली येथे असून ते सातत्याने मदुराईच्या संशोधन आणि विकास विभागास मदत करत असते ज्यामुळे भारत, युरोप आणि जपान सारख्या देशातील रस्त्यांकरिता उत्तम ठरतील अशा टायर्सची निर्मीती करता येऊ शकेल. टीव्हीएस श्रीचक्रची उत्पादने ही जगभरात सुमारे 85 देशातून उपलब्ध आहेत. भारतामध्ये कंपनीने स्वत:चे असे एक वर्चस्व आहे कारण कंपनीद्वारे मूळ साधनांसह उत्पादन आणि बदली सुविधा बाजारात उपलब्ध करून देण्याकरिता आपले एक व्यापक असे डिस्ट्रिब्युटर्स आणि डिलर्सचे जाळे निर्माण केले आहे, जे सातत्याने बाजारात आपले कार्य हे उत्तम पद्धतीने करत असतात. अधिक माहितीकरिता, भेट द्या: https://www.tvseurogrip.com.

Exit mobile version