नवी मुंबईत रंगणार महिला टेनिस चॅम्पियनशिप

17 देशांतील 61 खेळाडू सहभागी होणार

| नवी मुंबई | वार्ताहर |

नवी मुंबईकरांचे विशेष आकर्षण असलेली आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 17 देशातील 91 महिला टेनिसपटू सहभागी होणार असून यावर्षी विजेत्यांना 25 हजार डॉलर ऐवजी 40 हजार डॉलरची रक्कम देण्यात येणार आहे. रक्कम वाढवली गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वात 188 रँकिंग असलेली इकरीना मायक्रोवा (रशिया) आणि 196 रँकिंग असलेली जपानची टेनिसपटू मोयुका उचीजीमा या नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत खेळलेल्या मुलींना ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेत यापूर्वी खेळलेली टेनिस महिला पट्टू ऑस्ट्रेलियन ओपन, ग्रँड स्लॅम, ऑलम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच याही स्पर्धेत खेळणाऱ्या महिला टेनिसपटूच्या गुण संखेत वाढ होणार आहे. त्यामुळे त्यांना ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलियन ओपन व ऑलिंपिक मध्ये खेळण्यासाठी फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू बरोबर नवी मुंबईतील आणि देशातील खेळाडूनाही या स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे. टेनिस विश्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेमुळे येथील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिस कोर्ट उपलब्ध झाले आहे. येथील खेळाडूंना या स्पर्धेमुळे स्फूर्ती निर्माण होते. बॉल बॅक साठी येथील खेळाडू ठेवले जातात जेणेकरून त्यांना या स्पर्धेच्या बारकाव्याचा अभ्यास होईल, या स्पर्धेमुळे नवी मुंबई परिसरातील हॉटेल्स वगैरे यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेसाठी बाहेरून निधी जमा करण्यात येत असून थोड्या प्रमाणात क्लबचे पैसे वापरले जात असल्याची माहिती आयटीएफ स्पर्धेचे संचालक डॉ. दिलीप राणे यांनी दिली.

Exit mobile version