महिलांचा विश्वचषक ब्राझीलमध्ये

| बँकॉक | वृत्तसंस्था |

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील दिग्गज संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझील या देशामध्ये 2027 मधील महिलांच्या फुटबॉल विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. फिफाकडून या निवडीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. 2027 मधील महिला विश्वकरंडकाच्या आयोजनासाठी चार ठिकाणांहून प्रयत्न करण्यात आले होते. ब्राझीलसह मेक्सिको व अमेरिका तसेच दक्षिण आफ्रिका आणि बेल्जियम, जर्मनी व नेदरलँड यांनी आयोजनासाठी कंबर कसली होती. दक्षिण आफ्रिका व मेक्सिको-अमेरिका यांनी माघार घेतल्यामुळे ब्राझील व युरोपमधील देश यांच्यामध्ये थेट लढत झाली. फिफाशी संलग्न असलेल्या 207 देशांनी मतदान केले. यामध्ये ब्राझीलने 119 मतांसह विजय संपादन केला. युरोपियन देशांना 78 मते मिळाली. त्यामुळे ब्राझीलला यजमानपदाचा मान मिळाला.

Exit mobile version