। पाली/बेणसे । वार्ताहर ।
भारतीय बौद्धमहसभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्हांतर्गत तालुका शाखा पेणच्या वतीने पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली बुद्धनगर येथील जेतवन बुद्धविहार या ठिकाणी महिला उपासिका शिबिराचे रायगड जिल्हा अध्यक्षा संपदा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते आदर्शांचे पूजन करून, मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. मार्गदर्शन करत असताना रायगड जिल्हा अध्यक्षा संपदा चव्हाण यांनी चंद्रकांत सोनावणे यांचे कौतुक केले. तसेच या यशस्वी कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा ही देण्यात आल्या.पेण तालुक्याच्या जेष्ठ केंद्रीय शिक्षिका प्रतिभा जाधव यांनी आपल्या विषयात त्रिसंरण पंचशीला याचा अर्थसहित महत्व ही सांगितले.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे महिला उपासिका शिबीर
